अमेरिकेत पुन्हा बेछुट गोळीबार; 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिका : पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील आयोवा येथील एका शाळेत गोळीबाराची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयोवा येथील डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.पोलिसांचे म्हणणे आहे की गोळीबाराच्या घटनेनंतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांना बिझनेस पार्कमध्ये असलेल्या शाळेत पाचारण करण्यात आले होते. ही घटना दुपारी 1 च्या आधी घडली.शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांना गोळ्या लागल्या, त्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांनी तात्काळ सीपीआर दिला, मात्र दोन्ही विद्यार्थ्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमी शिक्षिकेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सोमवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.



यापूर्वी 22 जानेवारी रोजी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बचावकार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी म्हणजेच 23 जानेवारी झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना घडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने