पेपर पॅटर्नबद्दल विद्यार्थी आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाला सुरुवात

मुंबई:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नव्या परीक्षा पद्धतीविरोधात उमेदवार चांगलेच आक्रमक झालेले आहेत. MPSC च्या विद्यार्थ्यांचं सध्या राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे.आयोगाने वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीच्या धर्तीवर होणार आहे. ही परीक्षा पद्धती याच वर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे.



राज्यसेवेची मुख्य परीक्षा २०२३ पासूनच वर्णनात्मक पद्धतीने होत आहे. त्याऐवजी २०२५ पासून ही परीक्षा पद्धती लागू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. पुण्यातल्या अलका टॉकिज चौकामध्ये आंदोलन होत असून कोल्हापूर आणि औरंगाबादमध्येही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संतप्त होत एकत्र आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने