हजारो MPSC विद्यार्थ्यांना दिलासा; शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे: एमपीएसी विद्यर्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच सुरु होणार आहे.एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू करण्यात येणार आहे. एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार.मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.



एमपीएसी परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन केलं होत. पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अराजकीय 'साष्टांग दंडवत' आंदोलन करण्यात आले.या आंदोलनादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांची फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय कळवण्यात येईल आश्वासन दिले. त्यानंतर काही तासातच शिंदे - फडणवीस सरकारने या विद्यर्थ्यांना मोठा दिलासा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने