Microsoft चे नाडेला, Google च्या पिचाईंना मागं टाकत BGI रँकिंगमध्ये अंबानी दुसऱ्या स्थानी!

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी  यांनी ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागं टाकलं आहे.या निर्देशांकात मुकेश अंबानी भारतात पहिल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. ब्रँड फायनान्सनं ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स प्रमाणंच स्वतःचा ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स तयार केला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स त्याच्या कॉर्पोरेट ब्रँड मूल्यांकनाची रूपरेषा दर्शवितं. शिवाय, कंपन्यांच्या सीईओंच्या क्षमतेचं मोजमापही करतं.ब्रँड फायनान्सच्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स (BGI) 2023 मध्ये Nvidia चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग प्रथम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर आले आहेत, असं अहवालात म्हटलंय.



टॉप 10 मध्ये सर्वाधिक लोक 'भारतीय'

या दोघांनी पहिले दोन स्थान पटकावले असून, गेल्या वर्षीचा टॉपर मायक्रोसॉफ्टचा सत्या नाडेला तिस-या क्रमांकावर आला आहे. निर्देशांकातील टॉप 10 लोकांपैकी बहुतांश भारतीय किंवा भारतीय वंशाचे आहेत. Adobe चे शंतनू नारायण चौथ्या तर सुंदर पिचाई पाचव्या स्थानावर आहेत.डेलॉइटचे पुनीत राजन सहाव्या तर टाटा समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन आठव्या क्रमांकावर आहेत. DBS चे पियुष गुप्ता नवव्या स्थानावर आहेत, तर Tencent चे Huateng Ma 10 व्या स्थानावर आहेत. महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा 23 व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 40 वर्षांपासून ते गटप्रमुखाच्या भूमिकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने