प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; शिवाजी पार्कबाबत मोठा निर्णय

मुंबई: येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईवर हवाई हल्ल्या केला जाऊ शकतो, ही बाब लक्षात शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.संभव्या हल्ला लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना असे 26 जानेवारीला शिवाजी पार्कवर हवाई हल्ला होणार असल्याचे इनपुट मिळाले आहेत. त्यानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून या क्षेत्राला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.



पोलिसांनी कोणते निर्बंध लादले आहेत?
दुसरीकडे, प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उप-पारंपारिक हवाई उड्डाणांवर दिल्लीत बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग-ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान पॉवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई वाहनांना परवानगी नसेल असे आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केले आहेत  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने