मुरली विजयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई:  भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.विजयने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळला होता. मुरलीने 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. येथून पुढे आपण परदेशी लीगमध्ये नशीब आजमावणार असल्याचे मुरलीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.विजयने 61 कसोटीत 3982 धावा, 17 एकदिवसीय सामन्यात 339 धावा आणि 9 टी-20 सामन्यात 169 धावा केल्या आहेत. तर, कसोटी सामन्यात 12 शतके झळकावली आहेत. विजयची सर्वोच्च धावसंख्या 167 होती. त्याने कसोटीत 15 अर्धशतकेही केली आहेत. मात्र, वनडे आणि टी-20 मध्ये मुरलीला कसोटीसारखे यश मिळवता आले नाही.



मुरलीची पोस्ट काय?

निवृत्तीची घोषणा करताना मुरली विजयने ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. यात तो म्हणतो की, आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे, 2002 ते 2008 हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम होता. या काळात मी भारतासाठी योगदान दिले. त्यासाठी मी बीसीसीआय, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्जचे आभार मानतो असे मुरलीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने