नवाजुद्दीन सिद्दीकी चित्रपटांतील छोट्या-छोट्या भूमिकांबद्दल म्हणाला- '25 कोटी दिले तरी...'

मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दीकीने खूप संघर्षानंतर चित्रपटांमध्ये प्रसिद्धी मिळवली. नवाजुद्दीन चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. चित्रपटात 2 मिनिटांची भूमिका केली तरी ती कायम लक्षात राहते. नवाजने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात छोट्या भूमिकांमधून केली होती. छोट्या-छोट्या भूमिका साकारणाऱ्या नवाजचे नाव आजच्या दमदार आणि दिग्गज कलाकारांच्या यादीत सामील झाले आहे.नवाजुद्दीन सिद्दीकीला गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. लोकांनी त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले. पण आता आपण कोणत्याही किंमतीत छोट्या भूमिका करणार नसल्याचे अभिनेत्याने स्पष्ट केले आहे. खरं तर, नुकत्याच एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या कामाबद्दल आणि भूमिकांबद्दल मोकळेपणानं सांगितलं.



यादरम्यान नवाजने त्याने साकारलेल्या पात्रांबद्दल बोलताना सांगितले की, "माझ्या या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यात मी छोट्या भूमिका केल्या आहेत. पण आता खूप झाले. आता तुम्ही मला 25 कोटी दिले तरी मी छोट्या भूमिका करणार नाही.तो पुढे म्हणाला, "मला वाटते की पैसा आणि प्रसिद्धी हे तुमच्या कामाचे परिणाम आहेत. जर तुम्ही तुमचे काम चांगले केले तर पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या मागे येतील. तुम्ही त्यांचा पाठलाग केलात तर तुम्हाला ते कधीच सापडणार नाहीत, आपण आयुष्यभर पैसा आणि लोकप्रियतेच्या मागे धावतो आणि काहीही मिळत नाही. माझा विश्वास आहे की स्वतःला इतके मोठे करा, स्वतःला असे बनवा की पैसा आणि प्रसिद्धी तुमचे गुलाम बनून तुमच्या मागे धावतील”.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नवाज लवकरच हड्डी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून नवाजचा लूकही समोर आला आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून या चित्रपटाबाबत नवाजच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. हड्डीशिवाय नवाजकडे 'टिकू वेड्स शेरू' आणि 'बोले चुडियाँ' हे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने