कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावानंतर आता नवीन राज्यपाल...

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविल्यानंतर नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. अनेक राज्यपालांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी. डी. मिश्रा आणि आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.आता जगदीश मुखी यांच्याकडे नागालँडचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. ईशान्येकडील या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सिक्कीमचे राज्यपाल गंगाप्रसाद आणि ओडिशाचे राज्यपाल गणेशीलाल हे देखील चार वर्षांहून अधिक काळ राज्यपाल राहिले असले तरी अजून पाच वर्षे पूर्ण होण्यास वेळ आहे. कोश्यारी यांचा कार्यकाळ अजून अडीच वर्षांचा शिल्लक आहे.



कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात त्यांनी पंतप्रधानांना सर्व राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी कोश्यारी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. शिवाय त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं होतं. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कामांमध्ये व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनीही राज्यपाल झाल्यानंतर आपण नाराज असून आपण योग्य ठिकाणी नसल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले की, मी दु:खी आहे, आनंदी नाही. संन्यासी राजभवनात येतात तेव्हाच त्यांना आनंद होतं. जैन समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी बोलत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने