'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...

मुंबई: बिग बॉस 16 मध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे. सलमान खानने शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यावर ताशेरे ओढले असतानाच कुटुंबातील सदस्यही या दोघांवर भडकले आहेत.आता बिग बॉसचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये घरातील सदस्य पुन्हा एकदा शालीन आणि टीनावर हल्ला करत आहेत.या प्रोमो व्हिडिओमध्ये, बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात आणि म्हणतात, "आज मला हे जाणून घ्यायचं आहे की इतक्या आठवड्यांनंतरही घरात असं कोण आहे, कोणाची प्रतिमा अजूनही अस्पष्ट आहे." यावर अर्चनापासून अब्दूपर्यंत सगळेच शालीन आणि टीनाचं नावे घेतात.बिग बॉस 16 च्या या व्हिडिओमध्ये अर्चना गौतम म्हणते की मला शालीन आणि टीनाला यासाठी बोलवायचं आहे. कारण मला त्यांची प्रतिमा अजुनही अस्पष्ट वाटत आहे.



एवढेच नाही तर अर्चना असेही म्हणते की, "शालीनला या शोमधून काय हवे आहे, हे मला समजत नाही. जर शालीन आणि टीना प्रेमात आहेत, तर स्पष्ट म्हणा नाहितर आम्ही फक्त टाईमपास करत आहोत, आम्हाला फक्त शोमध्ये टॉप 3 मध्ये यायचे आहे." त्याच वेळी, अब्दू शालीन भानोतचे नाव घेतो आणि म्हणतो की तो फक्त 24 तास ओव्हर अक्टिंग करतो.सुंबुल तौकीर खानही शालीन भानोतवर भडकते. पण आश्चर्य म्हणजे या टास्कमध्ये टीना दत्ता देखील शालिनाचं नाव घेते.व्हिडिओमध्ये टीना दत्ता म्हणते की, "शालीन नेहमी मी-मी करत राहतो. मी तुझ्यासाठी हे केले, तुझ्यासाठी ते केले. आता काही कारणास्तव मी त्याला 'शा' म्हणणे बंद केले आहे." बिग बॉस 16 च्या या प्रोमो व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने