गडकरींना धमकीचे तीन कॉल; दुसऱ्या अन् तिसऱ्या कॉलमध्ये...

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे कॉल आलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले आहेत. सुरुवातीला दोन कॉल आल्याचं सांगितलं जात होतं. परंतु पोलिसांनी यामध्ये अपडेट्स दिलेले आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे जे तीन कॉलपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमध्ये बरोबर एक तासाचं अंतर आहे. गडकरी यांच्या नागपूर कार्यालयामध्ये सकळी ११.२५ वाजता पहिला कॉल आला. त्यानंतर दुसरा कॉल ११.३२ आणि तिसरा कॉल १२.३२ वाजता आला होता.



यासंदर्भात नागपूरचे डीसीपी राहुल मदाने यांनी सांगितलं की, नितीन गडकरींच्या कार्यालयात तीन धमकीचे कॉल आले आहेत. त्याचे डिटेल्स मिळत असून क्राईम ब्रँच सीडीआरवर काम करत आहेत. सध्या गडकरींच्या कार्यक्रमळी सुरक्षा वाढवल्याचं त्यांनी सांगितलं.नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. सकाळपासून तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने