....पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला, कारण...

नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी पाकिस्तानबाबत धक्कागायक दावा केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याच्या तयारीत होता, पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे. माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी आपल्या 'नेव्हर गिव्ह अॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकात म्हटले की, अणुहल्ल्याची ही माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. २७-२८ फेब्रुवारी २०१९ रोजी ही घटना घडली, तेव्हा अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी मी हनोई येथे होतो, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांच्या टीमने नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली.



अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या किती जवळ आले होते, हे जगाला कळलं असेल असं मला वाटत नाही. "खरं सांगायचं तर मला देखील याचं उत्तरही माहित नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक केली होती.माइक पॉम्पिओ म्हणाले की, व्हिएतनाममधील हनोईमध्ये असलेली ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही. मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी अणुहल्ल्याबाबत चर्चा केली होती. भारताचं काय म्हणणं आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. मात्र बाजवा यांनी सर्जिकल स्ट्राईकला चूक म्हटलं होतं. दुसरीकडे पॉम्पिओ यांच्या दाव्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने