टेन्शन वाढलं! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार, आता...

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत ही 23 जानेवारीला संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत आहेत. याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे. तर या संघटनात्मक निवडणुकांसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.



एकीकडे निवडणूक आयोगासमोर पक्षाची कायदेशीर लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. 23 जानेवारी 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची निवड झाली होती. ही निवड 5 वर्षांसाठी असते. ही मुदत 23 जानेवारी 2023 ला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. निवडणूक आयोग य=यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

पक्षप्रमुख पदाबाबतच्या चिंता आता वाढल्या आहेत. काल सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने याबाबत विंनती केली होती. यावर आयोगाने काल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता एका आठवडयानंतर पुन्हा सुनावणी आहे. याबबत आयोग काही निर्णय देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने