कोरोना रूग्णसंख्या आणखी घटली

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेला असताना भारतात मात्र मागील एका दिवसात रूग्णांची संख्या केवळ ९३ वर आली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के असून मागच्या २४ तासांत एकाही कोरोनाग्रस्ताचा देशात मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (शनिवारी) सकाळी ८ वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली.देशात आतापर्यंत संक्रमित रूग्णसंख्या ४ कोटी ४६ लाख ८२ हजार ५३० तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या केवळ ०.०१ टक्के म्हणजे १८४२ वर आली आहे. महामारीने मृत्यू झालेल्यांचा सरकारी आकडा ५ कोटी ३० ७३९ आहे.दैनंदिन संसर्ग दरही केवळ ०.०७ टक्के नोंदविला गेला आहे. 



देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे. भारतात आतापर्यंत एकूण ४,४१,४९,९४९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २२० कोटी ३६ लाख डोस देण्यात आले आहेत.देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये दैनंदिन रूग्णसंख्या ३० ते ४० लाखांवर पोहोचली होती. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तर १ कोटींहून जास्त लोक कोरोनाग्रस्त होते. त्यानंतर केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेला वेग दिला. कोरोनाच्या दोन स्वदेशी लसी तातडीने बाजारात आणल्या गेल्या व लसीकरण मोहीमेलाही त्याच वर्षी सुरवात झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने