जगातला सर्वात पॉवरफुल पासपोर्ट कोणता? 193 देशात मिळतो प्रवेश

नवी दिल्लीः तुमचा पासपोर्ट कुठल्या देशात चालतो, त्याच्या मर्यादा काय आहेत? हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवेडल. लंडनच्या ग्लोबल सिटीझनशिप अँड रेसिडन्स अॅडव्हायजरी फर्मने याबाबत आपला त्रैमासिक अहवाल जारी केला आहे. २०२३ मध्ये कोणते पासपोर्ट पॉवरफुल आहेत, ते पाहूयाजपानी नागरीक जगभरात १९३ देशांमध्ये व्हिसाजामुक्त प्रवास करु शकतात. शिवाय त्यांना मागणीनुसार सोप्या पद्धतीने व्हिसा मिळतो. त्याखोलोखाल सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या पासपोर्टचा समावेश आहे. १९२ डेस्टिनेशवर या व्हिसाद्वार प्रवास करता येतोय.




जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियानंतर जर्मनीची नंबर लागतो. जर्मनी आणि स्पेनच्या पासपोर्टधारकांना १९० देशांमध्ये बिनदिक्कत प्रवास करता येतो. त्यानंतर १८९ ठिकाणांवर फिनलँड, इटली, लक्जमबर्ग या देशांच्या पासपोर्ट कामी येतो.फ्रान्स, आयर्लंड, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम या देशांच्या नागरिकांना १८७ देशांमध्ये बिनदिक्कत प्रवेश मिळतो. त्याखाली बेल्जियम, न्यूझिलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका या देशांचा समावेश असून येथील पासपोर्ट १८६ देशांमध्ये चालतो. नागरिकांना तिथल्या देशांचा व्हिसा सहजपणे उपलपब्ध होतो.१८५ ठिकाणांवर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ग्रीस, माल्टा या देशांचे नागरिक प्रवास करु शकतात. त्यानंतर १८४ डेस्टिनेशवर हंगेरी आणि १८३ देशांमध्ये लिथुनिया, स्लोवाकिया येथील लोक पोसपोर्टवर प्रवास करु शकतात.हेनले अँड पार्टनर ही कंपनी त्रैमासिक अहवाल देते. १९९ पासपोर्ट कंपनीने रँक केले आणि सर्वात शक्तीशाली पासपोर्टसची यादी जाहीर केली.

हे आहेत कमी दर्जाचे पासपोर्ट

उत्तर कोरिया- १४० देश

नेपाळ - ३८ देशांमध्ये प्रवेश

सोमालिया - ३५ देश

यमन - ३४, पाकिस्तान - ३२, सीरिया - ३०, इराक- २९, अफगाणिस्तान- २७

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने