भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी; पक्षानं प्रणिती शिंदेंना दिली नवी जबाबदारी

सोलापूर : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद  उफाळून आला आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी सुरु आहे. त्यातच यावर्षी कर्नाटकात निवडणुका होणार असल्याने मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील काही राज्यावर दावा करत असल्याचं बोललं जात आहे.मात्र, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी खेळली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या  तोंडावर काँग्रेसनं सध्या तयारी सुरू केलीये. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षांकडून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीये.



लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड

कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाचे  निरीक्षक पदाची जबाबदारी आमदार शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलीये. यंदा कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांवर कर्नाटकातील लोकसभेच्या जागेवर निरीक्षक म्हणून निवड केलीये. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची यादीही जाहीर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने