थेट पंतप्रधानांना युद्ध न करण्याबाबत बजावणारे लष्करप्रमुख

दिल्ली : फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे इतिहासातलं गाजलेलं नाव. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती असो किंवा पाकिस्तानच्या ९० हजार सैनिकांना कैद करण्याची घटना असो त्यांच्या शूरतेच्या कथा जगभरातील सैन्यामध्ये अभिमानाने सांगितल्या जातात.माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक युद्धे जिंकली. ते इतके धाडसी व स्पष्टवक्ते होते की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील त्यांच्या चुका थेट तोंडावर सांगण्याची हिंमत त्यांच्याकडे होती.

2 जानेवारी 1973 चा दिवस त्यांच्यासाठी खास होता. त्याच दिवशी जनरल S.H.F.J. माणेकशॉ यांना फील्ड मार्शल म्हणून बढती देण्यात आली.गोरखा रेजिमेंटमधून आलेले, सॅम मॉनकशॉ हे भारतीय लष्कराचे 8 वे प्रमुख होते. भारतभरातून त्यांना प्रेम मिळाले. ते पारशी होते, म्हणून पारशी समाजातील लोक त्यांना 'अप्रो सॅम' म्हणायचे. गोरखा सैनिक त्यांना 'साम बहादूर' म्हणत. शिवाय त्यांचा जन्म अमृतसरमध्ये झाल्यामुळे शीखांना त्यांच्याबद्दल विशेष प्रेम होते. निवृत्तीनंतर त्यांनी निलगिरीला आपले घर केले, त्यामुळे ते तमिळ लोकांचेही प्रिय झाले.






तेव्हा इंदिरा गांधीही गप्प बसल्या

माणेकशॉ यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती बिघडत चालली होती. इंदिरा गांधी खूप अस्वस्थ होत्या. पाकिस्तानातून भारताच्या दिशेने निर्वासित येत होते. यावर उपाय म्हणून इंदिरा गांधींनी तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीत सॅमही होते. रिफ्यूजिंची समस्या सोडवण्यासाठी इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराला हस्तक्षेप करण्यास सांगितले.

थेट पंतप्रधानांचा आदेश आला होता मात्र लष्करप्रमुख माणेकशॉ यांनी त्याला विरोध केला आणि सांगितले की आमचे सैन्य यासाठी तयार नाही. युद्ध झाले तर मोठे नुकसान होईल. आम्हाला तयारी करण्याची संधी द्या. जेव्हा युद्धाची परिस्थिती येईल तेव्हा आम्ही पाकिस्तानला सहज धूळ चारू.मोनेकशॉ यांचे सडेतोड उत्तर पाहून इंदिरा गांधी शांत झाल्या. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा इंदिरा गांधींसमोर आवाज उठवण्याचे धाडसही लोकांमध्ये नव्हते. मात्र इंदिरा गांधी यांनी मोनेकशॉ यांचं म्हणणं ऐकलं आणि युद्धाची गडबड केली नाही. मोनेकशॉ यांनी देखील पंतप्रधानाना दिलेल्या शब्दानुसार युद्धाची तयारी केली आणि रणांगणावर पाकिस्तानला धूळ चारून त्या देशाचे दोन तुकडे केले आणि बांग्लादेशची निर्मिती केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने