'भारत जोडो' यात्रा स्थगित, राहुल गांधींची पत्रकार परिषदही रद्द; कारण...

पंजाब : जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षाने शनिवारी सुरू असलेली भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे. तसेच राहुल गांधी यांची जालंधर येथे रविवारी होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.संतोखसिंग चौधरी (वय ७७) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालत असताना शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने ते कोसळले. त्यानंतर ही यात्रा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली होती. चौधरी यांना तातडीने फगवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.




पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी सांगितले की, संतोखसिंग यांच्या रविवारी अंत्यसंस्कार केले जातील. तोपर्यंत यात्रा स्थगित राहिल. ही यात्रा आजसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र मी अद्याप राहुल गांधी यांच्याशी बोललो नाही, पण अंत्यसंस्कारानंतर यात्रा पुन्हा सुरू व्हावी, असे आम्हा सर्वांना वाटते.जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक निधनामुळे राहुल गांधी यांची उद्या जालंधरमध्ये होणारी पत्रकार परिषद आता १७ जानेवारीरोजी होशियारपूर येथे होणार आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी जयराम रमेश यांनी ट्विटरवर माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने