कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टच का? राहुल गांधींनी सांगितलं खरं कारण; म्हणाले...

नवी दिल्ली: भारत जोडो यात्रेदरम्यान कडाक्याची थंडी असूनही टी-शर्ट घालण्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी यात्रेत टी-शर्टच परिधान करण्याचे कारण सांगितलं. यावेळी राहुल गांधी यांनी केरळपासून सुरू झालेली यात्रा आणि तेथील वातावरण याविषयी माहिती दिली.राहुल गांधी म्हणाले की, "लोक मला विचारतात की मी हा पांढरा टी-शर्ट का घातला आहे, मला थंडी वाजत नाही का? वास्तविक प्रवास सुरू झाला तेव्हा... केरळमध्ये हवामान उष्ण आणि दमट होतं, पण आम्ही मध्य प्रदेशात प्रवेश केला तेव्हा थोडी थंडी होती." 




मात्र मध्य प्रदेशात 'फाटलेल्या कपड्यांमध्ये कुडकुडत असलेल्या' तीन गरीब मुलींना भेटल्यानंतर मी या यात्रेत केवळ टी-शर्ट घालण्याचा निर्णय घेतला.हरियाणाच्या अंबालामध्ये एका सभेत बोलताना ते म्हणाले, "एके दिवशी फाटलेल्या कपड्यांमधल्या तीन गरीब मुली माझ्याकडे आल्या होत्या..उबदार कपडे घातलेले नसल्यामुळे त्या मुली कुडकुडत होत्या. त्या दिवशी मी पण कुडकुडेपर्यंत टी-शर्ट घालायचं ठरवलं."राहुल पुढं म्हणाले की, जेव्हा मी जेव्हा कुडकुडायला लागेल, तेव्हा मी स्वेटर घालण्याचा विचार करेन. यातून मला त्या तीन मुलींना एकच संदेश द्यायचा की, जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर राहुल गांधी देखील तीच थंडी सहन करेल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने