"भावांनो आता काही उपयोग नाही" निकालाच्या वादावर सिकंदर पहिल्यांदाच बोलला

पुणे: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सर्वात चर्चेत ठरला तो पैलवान सिकंदर शेख. उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव झाला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. त्याची कुस्ती खेळण्याची पद्धत आणि त्याची शरीरयष्टी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चर्चेचा होता.मात्र उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडकडून सिकंदर शेखचा पराभव झाला. बाहेरची टांग या डावावर महेंद्र गायकवाडला चार गुण देण्यात आले आणि सिकंदरचा पराभव झाला. यानंतर खुप वाद झाले. निकालाच्या वादावर पहिल्यांदाच सिकंदर शेख साम टीव्हीशी बोलला.



साम टीव्हीशी बोलताना सिकंदर शेख म्हणाला की, माझी कुस्ती महेंद्र गायकवाड सोबत होती. मला आधी चेतावणी दिली तेव्हा 1 पॉइंट त्याच्या खात्यात गेला. दुसऱ्या खेळीत माझे त्याच्यावर 3 पॉइंट झाले तेव्हा 1-3 अशी कुस्ती चालू होती. मी निकलला घुसलो होतो तेव्हा त्यांनी मला टांग लावली. पण त्याची टांग परफेक्ट बसली नव्हती. पूर्णपणे कमरेचा कब्जा माझ्या हातात होता.त्याला यासाठी 4 पॉइंट द्यायचे असतील तर मी पूर्णपणे डेंजर झोन मध्ये असायला हवा होते. पण मी नव्हतो. मी एका अंगावर होतो आणि माझा कब्जा तिच्यावर होता. त्यावेळी त्यांनी त्याला 2 पॉइंट द्यायला हवेत. मला 1 पॉइंट द्ययला हवा होतं. त्याऐवजी त्यांनी 4-1 असा केला. हा त्यांचा चुकीचा निर्णय होता. त्यांच्या या निर्णयाचा फटका मला बसला आहे. पुढे मला 2 मिनिटात कवर करता आलं नाही. त्यांनी माझ्यावर पूर्णपणे पकड नसताना त्यांना 4-1 गुण देण्यात आला.

साम टीव्हीशी बोलताना म्हणाला की, संपूर्ण महाराष्ट्र नाही तर कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब माझ्यावर प्रेम करतात. माझी कुस्ती पाहायला येतात. माझा पराभव झाला तरी तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या. माझ्या पराभवानंतर सोशल मीडियावर मी पोस्ट पहिल्या पण भावांनो आता काही उपयोग नाही हे बोलून. जिथल्या तिथं सोडून द्या. छुटा हुआ तीर वापस नही आता असं झालेलं आहे.स्वतः पैलवान असलेल्या पण पैलवानकी करू न शकलेल्या सिकंदरच्या वडिलांनी हमाली करून सिकंदरला पैलवान म्हणून घडवले. उत्तर भारतातही सिकंदर 'टायगर ऑफ महाराष्ट्र' म्हणून लोकप्रिय आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखला पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर सोशल मीडियात सिंकदरच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने