एण्ड ऑफ द जर्नी! बिग बॉस फेम रुचिरा जाधवनं पुन्हा दिले ब्रेकअपचे संकेत?

मुंबई:   'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं. पण घरात अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे घरातून बाहेर पडताना रुचिरा रोहितवर रागावल्याचं चित्र समोर आलं होतं. दोघांमध्ये गैरसमज झाले, प्रचंड दुरावा आला.. हे नाते पुन्हा सांधले जाईल असे वाटत असतानाच, एक मोठी धक्कादायक पोस्ट समोर आली आहे.काही दिवसांपूर्वीच सर्व सदस्य पुन्हा एकदा घरात आले होते. यावेळी रोहित आणि रुचिरा एकत्र आले. पण दोघांमध्ये असलेली दरी सुस्पष्ट दिसली, तरीही मेघा घाडगे आणि प्रसाद जवादे यांनी त्यांचे नाते जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी एकमेकांना खीर भरवली. त्यावेळी हे नाते पुन्हा जुळले असे अनेकांना वाटले. पण परिस्थिती अजून सुधारलेली नाही, असे तिच्या पोस्ट वरून दिसते.



''खूप गोष्टी ठरवल्या होत्या, पण तशा झाल्या नाहीत. या इंडस्ट्रीत प्रत्येक संधी महत्त्वाची असते, माझ्यासाठीही होती. प्रत्येक शोनंतर वेगळा संघर्ष असतो. मी जीव ओतून शोमध्ये खेळले. जी गोष्ट मला अ‍ॅडव्हान्टेज म्हणून मिळाली होती, तीच दुर्दैवाने माझ्यासाठी डिसअ‍ॅडव्हान्टेज ठरली. ती नॅचरल राहिली असती तरी मला चाललं असतं,” यातून रुचिराने रोहित विषयी सांगितलं आहे असं दिसतंय.''“शो जिंकणे-हरणे हा मुद्दा नाही. मला मनासारखं खेळता न आल्याचा त्रास झाला. बदल फार जवळून पाहिलाय मी आणि त्या धक्क्यातून अजून सावरू शकलेले नाही. काही गोष्टी ठरवल्या होत्या, स्वप्न पाहिली होती आणि ती फक्त माझ्यासाठी नव्हती. शिवाय तुम्ही सगळे काय बोलता, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला कमवायला खूप वर्षे लागली आहेत,”

रुचिरा पुढे लिहिते, “मी ज्या भावनिक टप्प्यातून जात आहे, ते मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी एकटीच लढतेय. तुम्हाला पूर्ण गोष्टी माहीत नाही, त्यामुळे मला समजून घ्या, असं मी तुम्हाला म्हणत नाही. महिला असल्याने, पब्लिक फिगर असल्याने आणि अभिनेत्री असल्याने खूप गोष्टी बोलायच्या टाळतेय. पण कधी कधी खूप गुदमरायला होतंय, इतकंच सांगेन. तुमच्या स्वप्नांचा आदर न करणाऱ्यांसाठी तुमचं आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न जगा,” अशाप्रकारे रुचिराने नाव घेतलं नसलं तरी रोहित सोबतच्या नात्यावर रुचिरा बोलली आहे आणि दोघांचं ब्रेकअप झालंय असं दिसतंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने