पाकिस्तानला आता भारताच्या नावाने धमक्या; 'तो' फोटो शेअर करत तालिबानन डिवचलं

दिल्ली: तालिबानचा नेता अहमद यासिर याने १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाचे फोटो शेअर करून शेजारी देशाला चिंतेत टाकले आहे. विशेष म्हणजे, यासिरने १९७१ मध्ये पाकिस्तानने भारताला शरणागती पत्करल्याचा फोटो शेअर करत इस्लामाबादची खिल्ली उडवली आहे. तालिबानचा नेता अहमद यासिर यानेही पाकिस्तानला बदनामी टाळण्यासाठी अफगाणिस्तानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला युध्दाची धमकी दिली होती. 



पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला युध्दाची धमकी दिली होती.त्यानंतर तालिबानने त्यांच्या खास शैलित उत्तर दिले. अफगाणिस्तान हा नेहमीच त्याच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सक्षम आहे. अफगाणिस्तानवरील कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. असं तालिबानने म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने