बाजारातील तेजीला ब्रेक! प्रॉफिट बुकींगमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण

मुंबई : सुरुवातीचे दोन दिवस सातत्याने वाढीसह बंद झाल्यानंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींगमुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे.सेन्सेक्स पुन्हा 61,000 च्या खाली घसरला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 636 अंकांनी घसरून 60,657 अंकांवर तर NSE निफ्टी 190 अंकांनी घसरून 18,042 अंकांवर बंद झाला.2023 मध्ये पहिल्यांदाच शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. BSE मधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 281.61 लाख कोटी रुपयांवर आले आहे.मंगळवारी 284.65 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच गुंतवणूकदारांचे 3.04 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.



'या' शेअर्समध्ये घसरण :

टाटा स्टीलला सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.32 टक्क्यांनी तोटा झाला. याशिवाय टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, आयटीसी आणि एसबीआय मध्ये घसरण झाली.

या' शेअर्समध्ये तेजी :

डिविज लैब, एचडीएफसी लाइफ, मारुति सुजुकी, डॉ रेड्डी, अल्ट्राटेक सीमेंट, टीसीएसचे शेअर्स सेन्सेक्सवर वाढीसह बंद झाले. बुधवारी भारतीय चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 82.80 वर बंद झाले. मागील सत्रात रुपया ८२.८९ वर बंद झाला होता.सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी फक्त 2 तेजीत तर 28 समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 43 समभाग घसरले आणि 7 तेजीसह बंद झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने