'पंजाबची कतरिना' ते 'भारताची शहनाज गिल'चा प्रवास सोपा नव्हता...

मुंबई: 'मैं पंजाब की कतरिना' असं तिचं वाक्य..हे सुरवातीला ऐकल्यावर सर्व लोक तिला हसू लागले मात्र त्यानंतर तिने स्वत:ला असं सिद्ध केलं की ती केवळ पंजाब पुरता मर्यादित न राहिली नाही. तिने आता भारतच नाही तर जगातही तिचं नावं कमावलं आहे. ही गोष्ट आहे शहनाजची..तिला खरी ओळख मिळाली ती बिगबॉसच्या घरातून. एक निरागस आणि भोळा चेहरा, मस्तीखोर अशी ओळख असलेल्या शहनाज गिलचा आज वाढदिवस आहे.पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये 27 जानेवारी 1994 रोजी तिचा जन्म झाला. सर्व साधारण स्टार्स सारखं शहनाज गिलला देखील लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यामुळे तिने लहानपणापासूनच मॉडेलिंग सुरू केले.



वयाच्या 16 व्यावर्षी सगळे तिला कतरिना म्हणू लागले. कतरिना म्हणून ओळखलं जाणं हे शहनाजसाठी एक मोठी प्रशंसा वाटायची. याचा तिला खूप आनंद झाला. तेव्हापासून शहनाज स्वतःला पंजाबची कतरिना म्हणू लागली.पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर शहनाज गिलने अभिनय क्षेत्रात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र या प्रवासात शहनाजचे कुटुंबीय हे आवडतं नव्हते.चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम करून पंजाबमध्ये ठसा उमटवणाऱ्या शहनाजने 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला. शोमध्ये आल्यानंतर तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की 'बिग बॉस 13'च्या सुरुवातीला 'पंजाब की कतरिना' अशी ओळख करून देणारी शहनाज गिल शोच्या शेवटी 'इंडियाची शहनाज' बनली होती.शहनाज लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने