‘शिवपूत्र संभाजी’ महानाट्याला कुंभमेळा नगरीमुळे वेगळे महत्त्व : डॉ. अमोल कोल्हे

नाशिक : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या साधुग्राम, तपोवन येथील भूमीत ‘शिवपूत्र संभाजी’ हे महानाट्य सादर होणार आहे. त्यामुळे या महानाट्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी (ता. ८) येथे केले.नाशिकमध्ये येत्या २१ ते २६ जानेवारीपर्यंत ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य होणार आहे. या महानाट्यासाठी उभारण्यात येणाऱ्या स्टेजचे भूमिपूजन सोमवारी साधुग्राम येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. या महानाट्यात छत्रपती संभाजी राजांची प्रमुख भूमिका डॉ. कोल्हे साकारणार आहेत.



महंत भक्तीचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, सुरेश केला व खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते स्टेजचे भूमिपूजन झाले. या महानाट्यावर नाशिककर भरभरून प्रेम करतील, असा विश्‍वासही डॉ. कोल्हे यांनी या वेळी व्यक्त केला.उद्योजक धनंजय बेळे, नांदुरी गड सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्‍वस्त ॲड. दीपक पतोडकर, जयप्रकाश जातेगावकर, योगेश कमोद, धीरज बच्छाव, किरण पानकर आदी या वेळी उपस्थित होते. महंत भक्तीचरणदास महाराज म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा नगरीत हे महानाट्य साकारले जाणार आहे.नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न या महानाट्याच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नाशिककर नाट्य रसिक व शंभूप्रेमींनी याचा अवश्‍य लाभ घ्यावा असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

पहिल्या तिकीट खरेदीचा मान छगन भुजबळांना

‘शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे पहिले तिकीट माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते खरेदी केले.डॉ. कोल्हे यांनी महानाट्याची माहिती श्री. भुजबळ यांना दिली. आमदार हिरामण खोसकर, रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, सचिन कळमकर, अमोल नाईक, अमर वझरे आदी उपस्थित होते. महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीकडे पोचवण्यासाठी अशा स्वरुपातील महानाट्य उपयुक्त आहे, असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. यावेळी डॉ. कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी महानाट्य होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने