शुभांगी पाटलांना पाठिंबा देण्याबाबत NCP-Congress सावध! अजितदादा, म्हणाले...

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.



अजित पवार म्हणाले की, काँग्रेसकडून बंडखोरी केल्याबद्दल तांबे पिता-पुत्रावर कारवाई झाी आहे. तिथल्या शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माझ्याशी देखील त्या बोलल्या. इतर सहकाऱ्यांशी बोलून मला सांगा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे, हे समजून घेऊनच पुढील निर्णय घेणार आहोत, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी पाठिंबा देण्याबाबत अजित परावांनी सावध प्रतिक्रिया दिली आहेत. त्याचवेळी त्यांनी मातोश्रीवर गेल्यानंतर शुंभांगी पाटील यांना पाठिंबा मिळाल्याचा पुनरोच्चार केला.

दरम्यान जेवढे अपक्ष आहेत, त्यांच्यातील मेरीट ठरवून पाठिंबा देण्यात येईल. याबाबत उद्या महाविकास आघाडीची बैठक घेणार आहोत. त्यातच निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले. या संपूर्ण घडामोडींमुळे भाजपला संधी मिळाली आहे. आम्ही एकत्र येऊन मार्ग काढला होता. मात्र काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे प्रश्न निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने