याच कारणांमुळे लोक राहतात सिंगल...

मुंबई: प्रत्येकजण चांगल्या पार्टनरच्या शोधात असतो. एक चांगला प्रेम करणारा जोडीदार मिळावा, असे प्रत्येकाला वाटते पण अनेकांना त्याचं खरं प्रेम मिळत नाही आणि ते सिंगल राहतात. मुळात सिंगल राहणे ही एक चॉईसही असू शकते तर कधी सिंगल राहण्याचे अनेक कारणेही असू शकतात.आज आपण कोणत्या कारणाने माणूस सिंगल राहतो याविषयी जाणून घेणार आहोत.

 ओल्ड सोल्ड मानसिकता

ओल्ड सोल्ड मानसिकता असलेल्या लोक सहसा सिंगल राहतात. कारण त्यांना आताच्या जगाशी जमवून घेता येत नाही त्यामुळे त्यांचा फारसा कोणाशीही बॉंड निर्माण होत नाही ज्यामुळे प्रेमाच्या बाबतीतही या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो.

वास्तववादी प्रेम शोधणे

अनेक लोक त्यांचं मनासारखे प्रेम शोधण्याच्या नादात सिंगल राहतात. जगात काहीच परफेक्ट नाही. सर्व मनासारखं मिळत नाही त्यामुळे परफेक्ट शोधण्याचा प्रयत्न करु नये. गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारल्या तर अधिक सुंदर वाटतात. विशेष म्हणजे स्वत:मध्ये जर बदल केला तर सर्व काही सहज शक्य होतं.




प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात

जे लोक प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात त्यांना अनेकदा सिंगल राहावं लागतं. असे लोक कोणत्याही गोष्टी सहज स्वीकारत नाही. ते लोक प्रत्येक गोष्टींचा नकारात्मकरित्या विचार करतात ज्यामुळे त्यांना कधीही पार्टनर मिळत नाही.

डेटींग करणे टाईमपास वाटतो

ज्या लोकांना डेटींग हा टाईमपास वाटतो ते सिंगल राहतात. कारण त्यांना नात्यामध्ये जास्त रुची नसते. ते खूप प्रॅक्टीकल असतात ज्यामुळे त्यांना प्रेम सहज मिळत नाही.

स्वतंत्र राहायला आवडतं

अनेक लोकांना स्वतंत्र राहायला आवडतं. त्यांना त्यांच्या आयुष्यात कुणाचाही हस्तक्षेप आवडतो. त्यामुळे त्याचं फारसं कुणासोबत जुळत नाही ज्यामुळे ते सिंगल राहताता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने