'जगाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली, लवकरच Covavax ला बूस्टर परवानगी मिळेल'

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचेसीईओ आदर पूनावाला यांनी भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं कौतुक केलंय. ते म्हणाले, 'सरकार आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी निर्धारानं देशातील साथीच्या रोगाचा सामना केला आणि तो हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.'प्रत्येकजण आता भारताकडं आत्मविश्वासानं पाहत आहे. जग भारताचं कौतुक करत आहे. सरकार, आरोग्य कर्मचारी आणि सर्वसामान्यांच्या योगदानामुळंच हे शक्य झालं आहे. मी जगभर फिरलो, पण भारताची स्थिती इतर कोणत्याही देशापेक्षा चांगली आहे. मी सर्वांना भारतात राहण्याचं आवाहन करेन, असं पूनावाला यांनी सांगितलं.



माध्यमांशी संवाद साधताना पूनावाला पुढं म्हणाले, 'लवकरच आमच्या 'कोवावॅक्स' लसीला बूस्टर डोससाठी परवानगी मिळेल. पुढील 10-15 दिवसांत आमच्या बूस्टर डोसला परवानगी दिली जाईल. ही लस ओमिक्रॉन प्रकाराविरूद्ध खूप प्रभावी आहे. केंद्र सरकारकडं कोविशील्ड, कोवावॅक्सचा भरपूर साठा आहे. लवकरच आम्हाला 10-15 दिवसांत बूस्टर डोससाठी परवानगी मिळणार आहे.'सध्या Covishield चं उत्पादन बंद आहे. जेव्हा देशाला आवश्यक असेल, तेव्हा आम्ही त्याचं उत्पादन सुरू करू. परंतु, लवकरच Covavax लसीला बूस्टर डोस म्हणून परवानगी दिली जाईल. हे कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसाख मांडविया यांनी लोकांना केंद्रानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने