रस्ते, पाणी सोडा, जनतेतं 'लव्ह जिहाद'च्या मुद्दावरच बोला; भाजपच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई: कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार नलिन कुमार कटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, रस्ते आणि सांडपाण्याच्या समस्या छोट्या आहेत, असे सांगून वादाला तोंड फुटले आहे. मंगळुरूमध्ये सोमवारी 'बूथ विजय अभियाना'मध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकसभा खासदाराने हे विधान केले आहे.नलिन कुमार कटील हे कर्नाटकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, “मी तुम्हा लोकांना सांगतोय की रस्ते, सांडपाणी यासारख्या छोट्या मुद्द्यांवर बोलू नका. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत असेल आणि लव्ह जिहाद थांबवायचा असेल, तर त्यासाठी भाजपची गरज आहे. कायदा आणून फक्त भाजप सरकारच 'लव्ह जिहाद' थांबवू शकते. त्यामुळे लव्ह जिहादपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपला सत्तेत ठेवावे लागेल असं ते म्हणाले आहेत.



काँग्रेसने भाजप खासदारावर साधला निशाणा

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी नलिन कुमार कटील यांच्या लव्ह जिहादवरील विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि भाजप नेत्यावर टीका केली आहे. ते देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. डीके शिवकुमार म्हणाले, "ते खूप वाईट बोलले आहेत. त्यांना विकास दिसत नाही, ते द्वेष आणि देशाचे विभाजन करू पाहत आहेत असं ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले कर्नाटक भाजप अध्यक्ष

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिन कुमार कटील यांचे हे वक्तव्य सोमवारी सांगितले जात आहे. मंगळुरू येथील 'बूथ विजय अभियान' कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लव्ह जिहादच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. भाजप खासदाराच्या या वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, 'मी तुम्हा लोकांना सांगतोय, रस्ते, सांडपाणी यांसारख्या छोट्या-छोट्या मुद्द्यांवर बोलू नका. तुम्हाला लोकांना सांगावे लागेल की त्यांच्या मुलांसमोर लव्ह जिहादचा मुद्दा आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भवितव्याची चिंता असेल, लव्ह जिहाद थांबवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष हाच उपाय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने