इतके दिवसं कुठं होतीस! सलमानच्या चाहत्यांनी सोमी अलीला झाडलं..

मुंबई: अभिनेत्री सोमी अली गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये बॉलिवूड स्टार सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा करत आहे. सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खानच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत.या पोस्टच्या माध्यमातून सोमी अलीने सलमान खानवर अनेक गंभीर आरोपपण केले आहेत. सलमान खान विरोधात केलेल्या पोस्टमुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल केले जात आहे.ती आणि सलमान डेट करत असताना काय घडले या प्रश्नाचे उत्तर देताना तिने लिहिले की ती तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्षे होती. तो सतत तिला मारहाण करत असे, सलमान ने वर्षानुवर्षे तिला त्याची गर्लफ्रेंड म्हणून सार्वजनिकपणे स्वीकारले नाही आणि शेवटी जेव्हा त्याने असे केले तेव्हा तो त्याच्या मित्रांसमोर तिचा अपमान करेल आणि तिला नॉनस्टॉप मारले असं तिने लिहिले.






तब्बल २० वर्षांनंतर सोमी अली हिने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोमी अली सलमान खानविरोधात बोलताना दिसत आहे. या दरम्यान तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचे देखील म्हटले होते. आता सलमान खान याने सर्वांसमोर माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सोमीने केली आहे.पण तिच्या या पोस्टवरुनचं तिला ट्रोल केलं जात आहे. " सोमी तु आज तब्बल २० वर्षांनंतर सलमान खानवर आरोप करत आहे इतके वर्षे का तु गप्प बसली होती?" " आता हिचे पैसै संपले की काय म्हणून इतक्या वर्षांनी हिला हे सगळं आठवलं आहे, " सध्या कुठे काय नाही मिळत म्हणून हिला आता सलमान खानच नाव घेऊन आपलं काम करायचं आहे. अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टला नेटकरी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने