'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित

मुंबई:  'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे.




शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने