ग्राहकांना बसणार मोठा फटका! 'या' दिवशी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर

दिल्ली: या महिन्याच्या शेवटी बँकांच्या संपामुळे तुमच्या बँकांचे कामकाज ठप्प होऊ शकते. खरं तर, 30-31 जानेवारीला देशातील काही बँकिंग संघटनांनी संप पुकारला आहे.बँक संघटनांनी जाहीर केलेल्या दोन दिवशीय संपाची स्थिती आज 27 जानेवारीला कळणार आहे. बँक युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील समेटाची दुसरी फेरी 27 जानेवारीला होणार आहे.ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी सांगितले की, 30 आणि 31 जानेवारीला संप पुकारण्यात येणार आहे.मंगळवारी मुंबईत उपमुख्य कामगार आयुक्तांच्या झालेल्या सामंजस्य बैठकीत बँक संघटनांच्या मागण्या सोडविण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.दुसरीकडे इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने म्हटले आहे की, ते 15 दिवसांच्या आत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) सोबत चर्चा करण्यास तयार आहे.



अर्थसंकल्पापूर्वी संपाची हाक :

27 जानेवारी रोजी सामंजस्य बैठकीची पुढील फेरी होणार असून त्यामुळे संपाची हाक कायम आहे. संप झाला तर तो अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी असेल.युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) हा अनेक बँक युनियनचा समूह आहे. यापूर्वी विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.


बँक युनियनच्या काय आहेत मागण्या :

कामाचे 5 दिवस असावेत, पेन्शनमध्ये बदल करणे, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) रद्द करणे, वेतन सुधारणा करणे आणि सर्व श्रेणीमध्ये पुरेशी भरती करणे यासह बँक युनियनच्या अनेक मागण्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने