कॉल सेंटर वर ८ हजार कमवणाऱ्याने १७ हजार कोटींची कंपनी कशी उभी केली?

मुंबई:  ऑनलाईन ट्रेडिंग हा हल्लीचा ट्रेंड आहे. म्हणजे एखाद्या टपरीवर काम करणारा पोऱ्या ते एखाद्या हायफाय आयटी कंपनीत काम करणारा आयटी स्पेशालिस्ट... असे सगळेच जण हे ऑनलाईन ट्रेडिंग करत असतात. थोडक्यात आज मार्केट विषयी उपलब्ध होणारी सहज माहिती हे कारण त्यामागे असावं.पण हेच मागच्या दहा वर्षांपूर्वी बघायला गेलं तर असं अजिबात नव्हतं. मार्केट, शेअर ट्रेडिंग हा नेहमीच भीतीने बघितला जाणारा विषय. मार्केट रिस्क हा शब्द तेव्हा इतका भीतीदायक होता की, काही विचारू नका. पण काही जणांनी या भीतीवर मात केली आणि जगातील सर्वात तरुण बिलेनियर म्हणून फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले.



झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड ...

नितीन कामथ या तरुणाने २०१० मध्ये सुरू केलेली ही रिटेल ब्रोकरेज कंपनी आज या क्षेत्रात भारतात नंबर वन आहे. या कंपनीचा रोजचा टर्नओव्हर करोडोंच्या घरात आहे.वयाच्या १७ व्या वर्षी कामथ यांची स्टॉक ट्रेडिंगच्या जगाशी ओळख झाली.त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांत त्यांचं प्रत्येक शेअर ट्रेडरप्रमाणे नुकसानच व्हायचं. पण शिक्षण पूर्ण करून त्यांनी पूर्ण क्षमतेने शेअर ट्रेडिंगच्या मायाजालात उडी घेतली. त्यानंतर शेअर बाजार कोसळला. त्या वेळी एका कॉल सेंटरमध्ये महिना ८००० रुपये पगारावर नोकरीही केली.पुढे हळूहळू जम बसवत त्यांनी ऑगस्ट २०१० मध्ये झिरोदा कंपनी स्थापन केली. तेव्हा त्यांच्याजवळ टीम-मेंबर्सना नोकरीवर घेण्याइतकेही पैसे नव्हते. कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी स्वतः सचिन हे नाव वापरून स्वतःच्याच कंपनीत सेल्सपर्सन म्हणून काम केल.कस्टमरला कॉल करून ते त्यांच्याकडून अपॉइंटमेंट घ्यायचे, अकाउंट ओपनिंगसाठी फॉर्म भरण्याचं काम करायचे. त्यांनी स्वतः अशा पद्धतीने ५०० ते ६०० अकाउंट्स उघडल्याचं त्यांनी एका सेमिनारमध्ये सांगितलं होतं.

कामथ कंपनी सुरू करण्यापूर्वीही शेअर बाजारात व्यवहार करत होते. त्यामुळे शेअर बाजाराची चांगली समज त्यांना होती. त्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क होता. झिरोदा कंपनी सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या वर्षभरात एक हजार खाती उघडली आणि त्यांना स्वतः जॉइन करून घेतलं.त्यांचा लहान भाऊ नितीन हा देखील झिरोदाचा सहसंस्थापक आहे. २०२० मध्ये IIFL वेल्थ आणि हुरून इंडिया यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चाळिशीच्या आतल्या सेल्फ मेड श्रीमंतांच्या यादीत या दोन भावांची नावं आहेत. दोघांची संपत्ती सुमारे २४ हजार कोटी एवढी आहे.आजच्या घडीला झिरोदा या कंपनीचं मूल्य एक अब्ज डॉलर्सहून अधिक असून, त्यांच्या ग्राहकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. कंपनीचं मुख्यालय बेंगळुरूला आहे. अॅक्टिव्ह क्लायंट बेसच्या आधारे ही देशातली सर्वांत मोठी ब्रोकरेज फर्म आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने