Raj Thackeray परळीत दाखल; धनंजय मुंडे समर्थकांकडून 'राजे'शाही स्वागत, काय कनेक्शन आहे?

परळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज परळीमध्ये दाखल झाले. परळीत पोहोचताच त्यांचं राष्ट्रवादीकडून, धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार स्वागत झालं. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.



राज ठाकरे परळीत कशासाठी?

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठीच राज ठाकरे आले आहेत. सुनावणीनंतर हे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे कनेक्शन?

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं गाव पांगरी आहे, जिथे राज ठाकरे आले आहेत. याच भागामध्ये गोपीनाथगड असून वैजनाथ साखर कारखानाही याच भागामध्ये आहे. या कराड यांचे सुपुत्र या गावचे सरपंच आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं आहे.राज ठाकरेंना ५० फुटांचा भव्य हार घालण्यात आला, तसंच जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षावही करण्यात आला. त्यांच्या स्वागताची सध्या राज्यभर चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने