समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळेल?, सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी

नवी दिल्ली : भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता मिळेल की नाही, यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. जर समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली तर भारत जगात अशी मान्यता देणारा ३३ वा देश ठरणार आहे.आज न्यायालयात सुनावणीदरम्यान देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिका वर्ग करण्याच्या याचिकांवर देखील चर्चा होणार आहे.



एका समलैंगिक जोडप्याने त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून देशात त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी केलेल्या याचिकेवर उत्तर मागितले होते. यावर केंद्र सरकार काय उत्तर देईल याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी या खटल्याची सुनावणी लाईव्ह करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात अनेक लोक इच्छुक आहेत, त्यामुळे सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमिंग व्हायला हवे. त्यांच्या मागणीवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले होते की, सुनावणी होईल तेव्हा आम्ही त्यावर विचार करू. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने