...तर ‘गोकुळ’वर प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षकांनी दहा दिवसांत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशीनंतर दोष आढळले, तर गोकुळवर प्रशासकांची नियुक्तीही होऊ शकते.गोकुळमध्ये गैरकारभाराची चौकशी व्हावी, यासाठी संचालिका शौमिका महाडिक यांनी मागणी केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. ११) गोकुळमध्ये चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सौ. महाडिक यांनी गोकुळमध्ये झालेल्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून प्रश्‍नांची योग्य व अपेक्षित उत्तरे दिली जात नाहीत, अशी तक्रारही जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती.गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण होणार असल्याची माहिती समजली. तपासणीसाठी जे अधिकारी येतील, त्यांना गोकुळकडून सर्व सहकार्य केले जाईल. तपासणीसाठी आवश्‍यक असणारी सर्व माहिती दिली जाईल.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने