ट्रॅक्टरचे सुटे भाग निर्माण होतात, मग ट्रॅक्टर का नाही ; गडकरी

कोल्हापूर  : संधी आहे, गरज आहे फक्त सकारात्मक दृष्टीने लाभ घेण्याची, अशीच काहीशी प्रतिक्रिया औद्योगिक क्षेत्रातून आज उमटत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान उपस्थित उद्योजकांना उद्देशून कोल्हापुरात ट्रॅक्टरचे सुटे भाग निर्माण होतात. मग ट्रॅक्टर का निर्माण होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.याचे पडसाद आज उद्योजकांमधून उमटत होते. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वाधिक जीएसटी देणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. ७.५ लाख कोटींची उलाढाल असणाऱ्या‍ ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची येणाऱ्या तीन वर्षांत १५ लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले.

सध्‍या ऑटोमोबाईल क्षेत्रात देशातील ४.५ कोटी युवकांना रोजगार उपलब्ध आहे. येणाऱ्या तीन वर्षांत यामध्येही मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. तसे झाल्यास वाहन निर्मिती क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाहन निर्मिती उद्योगात नुकतेच जर्मनीला मागे टाकत भारताने तिसऱ्या‍ क्रमांकावर आपले स्थान पटकावले आहे.कोल्हापुरात निर्माण होणाऱ्या कृषी मालाला आणि औद्योगिक उत्पादनाला हातकणंगले येथे जागा मिळाल्यास सॅटेलाईट किंवा ड्राय पोर्टच्या माध्यमातून थेट एक्सपोर्ट करणे शक्य आहे आणि असे झाले तर एक्सपोर्ट करणाऱ्या‍ देशातील पहिल्या तीन जिल्ह्यात कोल्हापूरचे नाव घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



त्यामुळे कोल्हापूरला वगळून सोलापूरमार्गे पुढे कर्नाटकात जाणाऱ्या‍ पुणे-बंगळूर इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी त्यांनी सशक्त पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पुण्यात उद्योगाचे सॅच्युरेशन झाले असल्याने कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी पुण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक व आयटी प्रकल्पांना कोल्हापुरात गुंतवणूक करण्याविषयी विनंती करावी, तसे झाल्यास दरडोई उत्पन्नात कोल्हापूर कायमस्वरुपी अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रॅक्टर निर्मिती केल्यास कोल्हापूर रोल मॉडेल

बाहेरील मोठे उद्योग कोल्हापुरात येण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या उद्योजकांनी पुढाकार घेत ट्रॅक्टर निर्मिती केल्यास कोल्हापूर देशात एक रोल मॉडेल ठरे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने