मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनला मोठा दिलासा; करता येणार विदेश प्रवास

मुंबई: २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला दुबई येथे जाण्याची परवानगी दिली आहे.27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठी जॅकलिनतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती.त्यावर कोर्टाने वरील आदेश देत जॅकलिनला विदेशात जाण्यास परवानगी दिली आहे. जॅकलिन पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला जाणार आहे.दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या मैफलीत जॅकलिनला स्टार परफॉर्मर म्हणून आंमंत्रित करण्यात आले आहे. त्यात उपस्थिती लावण्यासाठी आपल्याला विदेशात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जॅकलिनने कोर्टाकडे केली होती. अखेर कोर्टाने तिला यासाठी परवानगी दिली आहे.



कोर्टाने दिला आहे नियमित जामीन

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन एक आरोपी असून, 15 नोव्हेंबर 2022 रोजी तिला या प्रकरणात नियमित जामीन मंजूर करण्यात आला असून, यावरील पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर सुकेश चंग्रशेखरची सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने