वाहन चालकांसाठी नितीन गडकरी आणणार नवा कायद; आता ट्रक चालकांनी...

दिल्ली:   केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. टोल टॅक्स नियमात दिलासा दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री ट्रक चालकांसाठी नवा कायदा आणणार आहेत.ज्याद्वारे सरकार ट्रकचालकांचे तास निश्चित करणार आहे, जेणेकरून कोणालाही जास्त काम करावे लागणार नाही. यासोबतच देशभरात होणाऱ्या रस्ते अपघातांनाही आळा बसणार आहे.



रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी होतील :

नितीन गडकरी यांनी माहिती देताना सांगितले की, 2025 साल संपण्यापूर्वी रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे सरकार नवीन कायदे करत आहे.

केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

रस्ते सुरक्षा सप्ताहादरम्यान 'सडक सुरक्षा अभियाना'मध्ये केंद्रीय मंत्री म्हणाले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते मंत्रालय कटिबद्ध आहे आणि रस्ते सुरक्षा - अभियांत्रिकी, शिक्षण आणि आपत्कालीन क्षेत्र यामध्ये अनेक पावले उचलली गेली आहेत.

कामाचे तास निश्चित केले जातील :

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी निवेदनानुसार, गडकरी म्हणाले की, ट्रक चालकांसाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. या वर्षी, मंत्रालयाने 'सर्वांसाठी सुरक्षित रस्ते' ला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता सप्ताहा अंतर्गत 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह (RSW) साजरा केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने