'तुम्ही नथुरामाला हिरो बनवता', आता काय बोलायचं! गांधींचे पणतू भडकले

मुंबई:   बॉलीवूडच्या गेल्या काही वर्षांपासून जे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत त्यावरुन वाद होताना दिसत आहे. काश्मीर पंडितांवर होणाऱ्या अत्याचारावर आलेल्या काश्मीर फाईल्सनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाची चर्चा आहे.प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची गोळ्या घालून हत्या करणारा नथुराम गोडसे यावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते.



यासगळ्यात सोशल मीडियावर राजकुमार संतोषी यांच्या त्या नव्या चित्रपटानं पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील या विषयांवरील चित्रपट आणि नाटकांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाची नेहमीच चर्चा होत असते. येत्या २६ जानेवारीला राजकुमार संतोषी यांचा गांधी गोडसे एक युद्ध नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी संतोषी यांच्या या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला तर अजिबात नवल वाटलं नाही जेव्ही मी या चित्रपटाबद्दल ऐकलं. याचे कारण म्हणजे, तुम्ही ज्या व्यक्तीनं गांधींची हत्या केली तुम्ही त्या व्यक्तीला हिरो बनवता आहात. यावर आणखी काय बोलायचे, असा प्रश्न तुषार गांधी यांनी विचारला आहे.

राजकुमार संतोषी यांनी वेगळ्या अँगलमधून या चित्रपटाची निर्मिती केल्याचे बोलले जात आहे. नथुरामानं हल्ला केल्यानंतर जर गांधीजी वाचले असते तर देशाचे राजकारण, समाजकारण कसे असते याचा विचार या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. यावर तुषार गांधी यांनी तुम्ही विनाकारण नथुराम गोडसेचे उदात्तीकरण का करता आहात असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने