जमीन हादरली, माणसं कोसळली; भूकंपाचा थरार कॅमेऱ्यात कैद

इंडोनेशिया : उत्तराखंड येथील जमीन दिवसेंदिवस खचत असल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच इंडोनेशिया येथे सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर शहारे येतील. ट्वीटरवर राहुल सिसोदिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.



व्हायरल होत असलेल्या व्हिडिमध्ये तीन चार लोकं दिसत असून ते जंगलात आहेत. त्यांच्या शेजारी दूरवर एक घरही आहे. व्हिडिओ शूट चालू असताना अचानक झाडे हलू लागतात आणि उभा असलेला व्यक्ती खाली कोसळतो. ही थरारक घटना पाहून तिथे असलेले लहान मुले आरडाओरड करताना आपल्याला दिसत आहेत.दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकं घाबरून गेली आहेत. ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती असून हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय. ही घटना कधी घडली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने