"पुतीन यांची प्रकृती ढासळली, लवकरच मृत्यू होणार"

रशिया : पुतीन यांची प्रकृती ढासळली असून लवकरच त्यांचा मृत्यू होईल, असं युक्रेनच्या तपास यंत्रणेच्या प्रमुखाने सांगितलं आहे. पुतीन यांना कर्करोगाने ग्रासल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.युक्रेनच्या तपास यंत्रणेचे प्रमुख कायरेलो बुडानोव्ह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुतीन गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मला खात्री आहे की त्यांना कॅन्सर झाला आहे. मला वाटतं त्यांचा लवकरच मृत्यू होईल. लवकरच व्हावा अशी अपेक्षा.



आपल्याला ही माहिती पुतीन यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळाली असल्याचंही बुडानोव्ह यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पुतीन आता आपल्या मृत्यूनंतर सत्ता कोणाकडे द्यायची हे शोधत आहेत.रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच तपास यंत्रणेच्या प्रमुखांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. मात्र पुतीन यांच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. गेल्या महिन्यात पुतीन आपल्या कार्यालयामध्ये पायऱ्यांवरुन घसरून पडले. यावेळी पुतीन यांचे सुरक्षारक्षकही सोबत होते. त्यांनी पुतीन यांना सावरलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने