अक्षय कुमारच्या ‘कठपुतली’ने OTT वर रचला विक्रम, अजय देवगणची ‘रुद्र’ ठरली सर्वाधिक पाहिली गेलेली वेब सीरिज

मुंबई:  २०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी फार चांगलं राहीलं नाही. अगदी मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले होते. या वर्षात सर्वात जास्त फ्लॉप चित्रपट जर कुणाचे ठरले असतील तर ते अक्षय कुमारचे होते. मागच्या पूर्ण वर्षात अक्षयचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. वर्ष निराशाजनक गेलं असेल तरी अक्षयसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्याचा डिजिटल रिलीज ‘कठपुतली’ हा गेल्या वर्षी ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट होता.

‘ओरमॅक्स’च्या अहवालानुसार, अजय देवगणची ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ ही वेब सिरीज व ‘कठपुतली’ हा चित्रपट या ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या कलाकृती होत्या. चित्रपटांच्या बाबतीत ‘कठपुतली’नंतर यामी गौतमचा ‘द थर्सडे’ चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर, विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या यादीत दीपिका पादुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाचाही समावे आहे. हा चौथ्या क्रमांकावर असून कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर राहिला.



‘कठपुतली’ चित्रपटात अक्षय कुमारने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यामध्ये रकुल प्रीत सिंगचीही महत्त्वाची भूमिका होती. तर, ‘द थर्सडे’मध्ये यामी गौतमबरोबर नेहा धुपियाने महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात डिंपल कपाडियादेखील होत्या. तर, ‘गोविंदा मेरा नाम’मध्ये विक्की कौशलसोबत भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होत्या. ‘गहराइयां’मध्ये दीपिकाबरोबर अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी होते. तर, ‘फ्रेडी’मध्ये कार्तिक आर्यनसह अलायाची मुख्य भूमिका होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने