भीमाशंकर कारखान्याचे वजन काटे बिनचुक भरारी पथकाकडून अचानक वजनकाट्यांची तपासणी

पुणे: दत्तात्रयनगर आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी अहवालात दिला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापन भरारी पथकाचे प्रमुख पुण्याचे वैधमापन विभागाचे सहाय्यक नियंत्रक संजीव कवरे व वैधमापन जुन्नर विभाग निरीक्षक प्रदीप बागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट देवून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील वजन काटयांची तपासणी करण्यात आली तपासणीनंतर हे वजन काटे बिनचुक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला.



यावेळी ऊसाने भरलेले ट्रक व बैलगाडयांच्या वजनांची कसून तपासणी केली. ऊसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणीत असल्याची शहानिशा केली. यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतुकदार व वाहन चालक आदी हजर होते.माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे हित सदैव डोळयासमोर ठेवून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालविला जातो.ऊस उत्पादकांचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. कारखान्याचे सर्व वजन काटे हे शेतक-यांना त्यांच्या ऊसाच्या वजनाची खात्री करण्यासाठी नेहमी खुले ठेवले आहेत. यामुळे शेतक-यांना आपल्या वजनाची खात्री करता येते. येथे नेहमीच पारदर्शक पध्दतीने काम केले जाते. आजच्या भरारी पथकाच्या तपासणी नंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखीत झाली आहे. अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष श्री. बेंडे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने