पाकिस्तान पिठाला महाग! 'भारतासोबत युद्धामुळे मिळाली गरिबी'; हृदयद्रावक

इस्लामाबाद : पाकिस्तामध्ये अन्न संकटाने धुमाकूळ घातला असून लोक एका वेळच्या जेवणासाठी महाग झाले आहेत. तर दैनंदिन वापरात असलेल्या सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकारकडून तेथील नागरिकांना अन्न पुरवठा केला जात असून नागरिकांची गव्हासाठी हाणामारी होत आहे.दरम्यान, पाकिस्तानच्या या भयानक संकटाने अनेक देशांनी त्यांच्यासाठी मदत जाहीर केली आहे. पण गावोगावी लोकांच्या लागलेल्या रांगा आणि धान्य वाटपासाठी आलेल्या सरकारी वाहनावर होत असलेली गर्दी पाहून केंद्र सरकारकडून लष्कर सुरक्षेच्या मदतीने अन्न वाटप केलं जात आहे.



भारताविरूद्धच्या युद्धामुळे मिळाली गरिबी - पंतप्रधान शरीफ

या अन्न संकटामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतासोबत झालेल्या युद्धाची आठवण झाली आणि भारतासोबत केलेल्या युद्धामुळे पाकिस्तानवर गरिबी आली असं वक्तव्य पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी केलं. तर "भीक मागून सुद्धा भीक मिळत नाही, विष खायला सुद्धा पैसे नाहीत" अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

मोदींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

तर या संकटातच पाकिस्तानात मोदींचा २०१९ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते पाकिस्तानला कटोरा घेऊन भीक मागायला लावेन असं आव्हान जनतेला करत आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने