कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

मुंबई: भारतीय दिग्गज कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात देशातील अव्वल कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर निदर्शनं सुरु केली आहेत.ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपही विनेश फोगाट आणि साक्षी मलिक  यांनी केला आहे. जंतरमंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झालंय. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी  यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांवर ट्विट करत चौकशीची मागणी केलीये.



प्रियांका गांधींनी आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंबद्दल लिहिलंय, "आमचे खेळाडू देशाची शान आहेत. ते जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीनं देशाची प्रतिष्ठा उंचावत असतात. या खेळाडूंनी कुस्ती महासंघ आणि त्याच्या अध्यक्षांवर शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंचा आवाज ऐकला गेला पाहिजे. आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे."कुस्तीपटू गीता फोगटनंही ट्विट करत विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. तिनं लिहिलंय, "आज हे चित्र पाहून खूप वाईट वाटतं की, आपल्या देशाचे ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे धरून बसले आहेत. ही हुकूमशाही थांबली पाहिजे. आज आम्ही आमच्या खेळाडूंच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत." कुस्तीपटूतून राजकारणी बनलेल्या बबिता फोगटनंही या प्रकरणावर ट्विट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने