दिल्ली महापालिकेत AAP-BJP मध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?

दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीच्या तब्बल तीन महिन्याननंतर दिल्लीला महापौर आणि उपमहापौर मिळाले. पण स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सध्या राडा सुरू असून आप नेते आणि भाजप नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्षाचे नेते या धक्काबुक्कीसाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत.





नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

स्थायी समितीच्या निवडणुकीत चार उमेदवार आपचे आणि तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपचे नवनिर्वाचित महापौर शैली ओबेरॉय यांनी क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी काही जणांना मोबाईल आत घेऊन जाण्याची परवानगी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.मोबाईत आतमध्ये घेऊन जात काही जणांनी बॅलेट पेपरचे फोटो काढले. त्यामुळे भाजप नेत्यांनी या घटनेचा विरोध केला. पण तोपर्यंत ४७ मते पडले होते. त्यानंतर महापौराने आत फोन घेऊन जाण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.दरम्यान, आता ही निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी भाजपकडून होत असून हे गुप्ततेचं उल्लंघन असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. तर आधी टाकले गेलेले मत पुन्हा टाकता येणार नाहीत असं मत महापौरांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने