भाजपनं ED, CBI नंतर EC ला कच्छपी लावलं; अंधारे पुन्हा बरसल्या

मुंबई: केंद्रीय निवडणुक आयोगाने काल संध्याकाळी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या गटाला दिले आहे.आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.अंधारे म्हणाल्या की, भाजपनं ED, CBI नंतर आता निवडणूक आयोगाला कच्छपी लावण्याचे काम केल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

आयोगाचा हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मुळीच पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होतं असे म्हणत अंधारे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.ज्यावेळी तथ्यांच्या आधारावर कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यास आली होती. त्यावेळी शिंदे गटाकडून ४ लाख कागदपत्र सादर करण्यात आली तर, आम्ही २२ लाख डॉक्युमेंट सादर केल्याचे अंधारे म्हणाल्या.



मग स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही?

यावेळी अंधारे म्हणाल्या की, सत्तांतरानंतरदेखील अंधेरी पूर्व ची पोटनिवडणुकीत आणि पाच विधान परिषदेच्या जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा उमेदवार नव्हता.त्यानंतर आता कसबा आणि चिंचवडमध्येदेखील शिंदे गटाचा एकही उमेदवार नाहीये. त्यामुळे तुम्हाला मेरीट सिद्ध करायची संधी मिळालेली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की आम्ही मेरीट सिद्ध करतो, मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का घेत नाही? असा सवालदेखील यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

CM शिंदेंचा कळसूत्री बाहुलीसारखा वापर

यापूर्वी ईडी आणि सीबीआय सारख्या स्वायत्त यंत्रणांना कामाला लावलं होतं. त्यानंतर आता निवडणूक आयोगालाही कामाला लावलं असून, भाजप जर अशा पद्धतीने निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखी वापर होत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे की आपण असे वागावे का? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने