नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्ते भारतात दाखल होणार, Kuno Park स्वागतासाठी सज्ज

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात  असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आज (शनिवार) आणखी 12 चित्त्यांची  भर पडणार आहे.त्यामुळं उद्यानातील चित्त्यांची संख्या 20 होणार आहे. या चित्त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना धोका कमी असल्याचं एका अभ्यासात समोर आलंय. चित्ता प्रकल्पाचे प्रमुख एसपी यादव म्हणाले, ग्लोबमास्टर सी-17 विमानानं 12 चित्तांसह भारतात उड्डाण केलं आहे. सकाळी 10 : 30 वाजता या चित्त्यांचं ग्वाल्हेर विमानतळावर आगमन होईल. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री शिवराज चौहान या कार्यक्रमात सहभागी होतील.




12 चित्त्यांच्या गटात 7 नर आणि पाच मादी

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 12 चित्त्यांच्या या गटात सात नर आणि पाच मादी चित्ता आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबरला कुनो नॅशनल पार्कमध्ये लाकडी पिंजऱ्यांचे दरवाजे उघडून नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांचं स्वागत केलं होतं.या चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानानं आज सकाळी ग्वाल्हेरला आणलं जाणार आहे. भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने