चीनसह 6 देशांतील प्रवाशांना कोरोना नियमातून दिलासा! 'या' दिवसापासून होणार लागू

नवी दिल्ली : कोरोनाच्या नियमांसदर्भात एक महत्वाची अपडेट आता समोर आली आहे. त्यानुसार, चीनसह ६ देशांतील प्रावाशांना कोरोनाच्या नियमांतून दिलासा देण्यात आला आहे. त्यासाठी या प्रवाशांना कोविडची पूर्व तपासणी आणि स्वतःहून आरोग्यासंदर्भातील घोषणापत्र अपलोड करण्याची गरज पडणार नाही. पण अशा प्रवाशांपैकी निवडक २ टक्के लोकांना चाचणी करणं सुरुच राहणार आहे.नागरी उड्डाण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं, चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही नवी नियमावली लागू असणार आहे. गेल्या ४ आठवड्यांपासून या देशांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं घसरण दिसून आली आहे. त्यानंतर जागतीक आरोग्य संघटनेनं जाहीर केलंय की, गेल्या २८ दिवसांत नव्या कोविडच्या प्रकरणांमध्ये ८९ टक्के घट झाली आहे.







काय झालाय निर्णय?

निवेदनात म्हटलं की, भारतात कोरोनाच्या नव्या प्रकरणात सातत्यानं घसरण दिसून येत आहे. यामध्ये १०० हून कमी नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. मंत्रालयानं आपल्या आंतरराष्ट्रीय आगमनासाठी दिशानिर्देश अपडेट केलं जात आहे. सध्या चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया रिपब्लिक, थायलंड आणि जपानमधून येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर स्व-स्वास्थासंबंधी घोषणापत्र अपलोड करावं लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने