एअर इंडियाची मेगा खरेदी! टाटा समुहाचा विमान वाहतूक उद्योगाच्या इतिहासात सर्वात मोठा करार

मुंबई: टाटा सन्सने जेव्हापासून एअर इंडियाची सूत्रे हाती घेतली, तेव्हापासून त्यांनी आपली सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला. टाटा समूहाला एअर इंडियाला जागतिक दर्जाची एअरलाईन्स बनवायची आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या विविध एअरलाइन्सही 'एअर इंडिया' ब्रँडमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी एक-दोन नव्हे तर ५०० नवीन विमाने खरेदी करण्याची ऑर्डर देणार आहे. विमान वाहतूक उद्योगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी विमान ऑर्डर आहे.



एअर इंडिया आणि एअर बस यांच्यात २५० विमानांसाठी करार झाला आहे. एअरबस एअर इंडियाला २१० सिंगल-आइसल मॉडेल विमान (A-320) आणि ४० वाइड-बॉडी विमाने (A-350s) वितरित करेल. त्याचवेळी एअर इंडियाने बोईंगकडून २५० विमानांची ऑर्डर दिली आहे. बोइंग आपल्या मॅक्स-७३७ मॉडेलची १९० आणि ७८७ ड्रीमलाइनरची २० विमाने तसेच १० विमान ७७७ वाईडबॉडी  एअर इंडियाला सुपूर्द करणार आहेत. 

एअर इंडियाने यासाठी ९ लाख कोटी रुपयांचा करार केला आहे. हा सर्वात मोठा करार आहे. भारत सरकारकडून  एअर इंडिया विकत घेण्याला एक वर्ष पूर्ण होत असताना टाटा समुहाने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स व्यवसायात आपले अस्तिव्त अधिक बळकट करण्यासाठी एअर इंडियाला या विमानांती गरज होती. पुढचे ५ ते १० वर्ष ही विमानं  एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने